खांबाळेत BSNL ची ऑप्टिकल फायबर टेलिफोन आणि इंटरनेट सेवा कार्यन्वित

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 16, 2024 05:59 AM
views 367  views

वैभववाडी : ग्लोबल स्काय ब्रॉडबँड नेटवर्क्सच्या माध्यमातून खांबाळे येथे  बीएसएनएलची ऑप्टिकल फायबर सेवा सुरू करण्यात आली.सरपंच प्राजक्ता कदम यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील नेटवर्क सुविधा अभावी अनेकांची गैरसोय होत असे.ही बाब लक्षात आल्यानंतर माजी पंचायत समिती सदस्य  मंगेश लोके यांनी बीएसएनएनची नेटवर्क सुविधा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा केला.

त्यांच्या प्रयत्नांनतर खांबाळे येथे ग्लोबल स्काय ब्रॉडबँड नेटवर्क्सचे  गौस पाटणकर यांच्यामार्फत ऑप्टिकल फायबरची सेवा सुरू करण्यात आली.आता गावच्या ग्रामपंचायतीसह टेलीफोनसह नेट सुविधा उपलब्ध झाली आहे..याचा नुकताच शुभारंभ झाला आहे.ही सेवा गावात उपलब्ध होण्यासाठी सरपंच  प्राजक्ता कदम , उपसरपंच  गणेश पवार,ग्रामसेविका  नयना गुरखे, सोसायटी चेअरमन .प्रवीण गायकवाड,  दिग्दर्शक दीपक कदम,सन्मा. सन्मा.गुरुनाथ गुरव, सन्मा. दत्तात्रय परब यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं.