नोकरी-व्यवसाय करतानाही पदवीधर होण्याची संधी

YCMOU ची प्रवेश प्रक्रिया सुरु
Edited by: विनायक गावस
Published on: August 23, 2023 14:46 PM
views 87  views

सावंतवाडी : आता पदवीधर होण्याची संधी नोकरी, व्यवसाय करताही करण्याची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी यांच्या माध्यमातून सोपी झाली आहे. नोकरी-व्यवसाय करता करता शिक्षण घेत पदवी मिळवता येणार आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU पदवी शिक्षण मिळणार असून सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सावंतवाडी येथील नामांकित RPD ज्युनि. कॉलेज स्थित डॉ. जे.बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज शिक्षणात अग्रेसर व जिल्ह्यातील A श्रेणी प्राप्त अभ्यासकेंद्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा मार्फत विविध शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आलेत.

 

यात बी.ए. / बी.कॉम,एम. कॉम,एम.ए.(मराठी),एम.ए.(हिंदी),एम.ए.(इतिहास),एम.ए.(अर्थशास्त्र),एम.ए.(लोक प्रशासन), एम.बी.ए.(HR,Fin,Mkt,Mnfg),रूग्ण सहायक (पेशंट असिस्टंट)  तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आल आहे. 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षा (उदा. MPSC, UPSC)  साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण आहे. कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध करून देण्यात आलय. RPD ज्युनि. कॉलेज स्थित YCMOU अभ्यासकेंद्रात प्रवेशासाठी आजच मुख्य प्रवेश कार्यालय

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर.पी.डी.ज्युनि. कॉलेज, गेट  नं 2 समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ,सावंतवाडी येथे संपर्क साधावा असे आवाहन संचालक तुषार वेंगुर्लेकर यांनी केल आहे. अधिक माहितीसाठी तुषार वेंगुर्लेकर 8605992334, 9422896699 राहुल भालेराव 8856993826 या नंबरवर संपर्क साधावा.