उसप शाखा प्रमुखपदी निष्ठावंत शिवसैनिकाला संधी

Edited by: लवू परब
Published on: July 08, 2025 22:07 PM
views 60  views

दोडामार्ग :  दोडामार्ग तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उसप शाखा प्रमुख पदी निष्ठावंत शिवसैनिक सुरेश गवस यांची निवड केली असून, उसप गावाची जबाबदारी पुन्हा एकदा देण्यात आली आहे. सुरेश गवस हे गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत असून, पडत्या काळातही संघटने बरोबर प्रामाणिक राहिले आहे.

उसप गावातील निष्ठावंत कार्यकर्ते आजही पक्षांशी प्रामाणिक असून, ते पक्षाबरोबर कायम राहतील, ज्यांना सत्तेची आस होती ते सत्तेत च्या मागे जाणारे उसपमधील काही जण भाजप मध्ये गेले त्यांनी आपण सेनेशी किती एकनिष्ठ होतो  यांचा विचार करावा. बाळासाहेबांचे विचार घेऊन, उद्धव जी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते तयार होतील. त्यामुळे सुरेश गवस यांना शाखा प्रमुख पदी संधी दिली असून, विद्यमान शाखा प्रमुख सुभाष गवस यांची शाखा संघटक पदी निवड करण्यात आली असल्याची माहिती, तालुका प्रमुख संजय गवस व विभाग प्रमुख दरशथ मोरजकर यांनी दिली आहे.