सावंतवाडी : आपल्याच मातीत, आपल्या आई-वडिलांसोबत राहून नोकरी करण्याची संधी देण्याच भाग्य आम्हाला लाभल. पहिल्या टप्प्यातील यशानंतर आता अन्नपुर्णा टेक सोर्स व गो सोर्सच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला असुन याचा आनंद अधिक आहे अशा भावना अन्नपुर्णा टेक सोर्सच्या सीईओ सौ.अन्नपुर्णा कोरगावकर यांनी व्यक्त केल्या. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
कोरगावकर म्हणाल्या, सगळ्यांच्या साथीनं आम्ही दुसऱ्या टप्प्यात पदार्पण करत आहोत. याचा आनंद शब्दांच्या पलीकडे आहे. शेतकऱ्यांची सेवा करत असताना आता शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी करता येतय याचा अधिक आनंद आहे असं मत त्यांनी व्यक्त केल. माजगाव उद्यमनगर येथे दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी गो सोर्स मॅनेजिंग पार्टनर डेव्हिड क्लेमन्स, हेंसल डॉब्स, सीएसओ डेरिक पर्किन्स, अन्नपुर्णा टेक सोर्सच्या सीईओ सौ.अन्नपुर्णा कोरगावकर, गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे, व्हीपी नटवर शर्मा, सीओओ राहूल मिश्रा, अन्नपूर्णा टेक सोर्स प्रोप्रा. ऐश्वर्या कोरगावकर, भिकाजी कानसे, अँड. पुष्पलता कोरगावकर, श्रीरंग मंजूनाथ आचार्य, अखिलेश कोरगावकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, आजचा दिवस आमच्यासाठी स्पेशल ठरला. याआधीच्या प्रतिसाद अन् यशानंतर नव्या जोमाने सुरूवात करत आहोत. खास यासाठी एवढ्या दुरहून भारतात आलोत. भारतीय संस्कृती अन् परंपरेचा अनुभव या निमित्ताने घेता आला असे प्रतिपादन युएसएहून उपस्थित राहिलेले गो सोर्सचे मॅनेजिंग पार्टनर डेव्हिड क्लेमन्स, हेंसल डॉब्स, सीएसओ डेरिक पर्किन्स यांनी व्यक्त केले. तसेच आई-वडील अन् संतोष कानसे यांच्या साथीनं दुसऱ्या टप्प्याला सुरूवात करत आहोत. पदवीधर मुलांना जन्मभूमीतच नोकरीची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत अस मत प्रोप्रा. ऐश्वर्या कोरगावकर यांनी व्यक्त केले.
यावेळी गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे म्हणाले, आणखीन ६० जणांना आम्ही रोजगार देण्यासाठी सज्ज झालो आहोत. हा क्षण माझ्या आयुष्यात स्मरणीय असा आहे. ज्या ठिकाणी जन्मालो त्या समाजासाठी काम करण्याची संधी मला लाभली हे माझं भाग्य समजतो. नोकरीसाठी मोठ्या शहरात जाणाऱ्या तरूणाई त्यांच्याच मातीत, आई-वडीलांसोबत राहून रोजगार उपलब्ध करून देत आहोत याचा आनंद अधिक आहे असं मत श्री. कानसे यांनी व्यक्त केले.