
कुडाळ : कुडाळ शहरातील १३२५७ मत आहेत.यापैकी मी ९०% मते ही मिळवणारच आहे.मला ७० टक्के मत नकोत तर ९० टक्के मते हवी आहेत.विनायक राऊतांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. यासाठी तुमची मला साथ हवी आहे.असे भावनिक आवाहन करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले नारायण राणेंना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे.हे समजून तुम्ही कामाला लागा असे भावनिक आवाहन नारायण राणेंनी केले.कुडाळ येथील महायुतीच्या कुडाळ शहर कार्यकर्ता संवाद मेळाव्यात महालक्ष्मी हॉल येथे नारायण राणे बोलत होते.
कुडाळ- मालवण मधील माझा पराभव मी अद्याप विसरलो नाही.पण मी त्यावर मी कधीच बोललो नाही.अनेकजण यावर आजून बोलतात पण मी कधीच भाष्य करीत नाही.पण आजही तो पराभव मी विसरलेलो नाही.असे सांगत नारायण राणेनी जुन्या आठवणीना उजाळा दिला.
वाचन हा माझा छंद आहे.नगरसेवक असल्यापासून आपण सातत्याने पुस्तक वाचत आलो आहे.सकाळीच सहा वाजता उडून माझे दैनंदिन काम सुरू होतय.हे सगळ करत असताना माझी बांधिलकी ही माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना मी कधीच विसरलो नाही.मी ज्यावेळेस सिंधुदुर्गात आलो तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा मागास होता.तेव्हा मी ठरवल की या सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोण मागास जिल्हा म्हणणार नाही.टाटा कंपनीचे मॅनेजर यांना भेटलो.त्यांनी सुमारे चारशे पानाचा अहवाल दिला.कलेक्टर आणी सीएस ला त्याची काॅपी दिली.तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशीना त्यांची एक काॅपी दिली.
पण दुर्दैव म्हणजे सी वर्ल्ड सोडाच पण डिस्ट्री लॅण्डचा प्रोजेक्ट पण विरोधकांनी होवू दिला नाही.हे आपल्या विरोधकांचे दुर्दैव आहे. विरोधक केवळ माझ्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी आजारी असल्याची पोकळ हवा करून विरोधक बदनामी करू पाहत आहे.मी ठणठणीत आहे.दिक्षित यांचा डायट प्लॅन फाॅलोकरून तब्बल सोळा किलो वजन कमी केले आहे.मी जिद्दी आहे.मला हव ते मी प्रयत्न करून मिळवतो.अशा शब्दात नारायण राणेनी आत्मविश्वास व्यक्त केला.