
सावंतवाडी : पाकिस्तानने भारतावर आतंकवादी भ्याड हल्ला केला त्याला प्रतीउत्तरादखल भारताने ऑपरेशन सिंदूर करून शेकडो पाक आतंकवाद्यांना कंठस्थान घातले. त्याबद्दल सावंतवाडीतील स्वराज्य संघटनेने फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला.
पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुतळ्यासमोर हा जल्लोष करण्यात आला. यावेळी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.