
देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे फाटक क्लास येथील उघड गटार नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून, त्याचा प्रत्येय गुरुवारी आला. देवगडहून जामसंडेच्या दिशेने जाणारी इनोवा गाडीच्या चालकाला बंदिस्त गटारासाठी खोदलेल्या चराचा अंदाज न आल्यामुळे फाटक क्लास येथे खोदायी केलेल्या गटारांमध्ये पुढील चाक गेल्यामुळे ईनोवा गाडीचे नुकसान झाले असून मात्र गाडीतील प्रवाशांना कोणालाही दुखापत झाली नाही. आजूबाजूच्या दुकान चालकांनी घटनास्थळी धाव घेत गाडीतील प्रवाशांना धीर देत गटाराच्या चरात गेलेली गाडी काढण्यास मदत केले मात्र अशा अनेक अपघातांना निमंत्रण देणाऱ्या बंदिस्त गटाराकडे सार्वजनिक बांधकाम विभाग गांभीर्याने लक्ष देईल का ? असा सवाल यावेळी स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
देवगड निपाणी मार्गावर फाटक्लासनजी रस्ता साईट पट्टी खोदाई गेल्या वर्षभरापासून बंदिस्त गटार बांधणीचे काम संथगतीने सुरू असून पेट्रोल पंप ते गणेश नगर परिसर पूर्णपणे अपघातास निमंत्रण ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा निष्काळजीपणा सर्वसामान्यांच्या जीवावर उठत आहे.दररोज एक दोन अपघात होत आहेत अनेकांच्या गाड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.याला जबाबदार कोण ? सुस्त सार्वजनिक बांधकाम विभागाला एखाद्याचे प्राण गेल्यावर जाग येणार का ? असा सवाल नागरिकांसह वाहन चालकांमधून उपस्थित केला जात आहे.तसेच मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या उघड्या गटारामुळे या ठिकाणच्या एसटी थांब्यावर उतरणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या गटारामध्ये काही प्रवासी यापूर्वी पडल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन हे उघड्या गटाराचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. पेट्रोल पंप ते गणेश नगर या दरम्यान गेल्या वर्षभरापासून बंदिस्त गटाराचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्यामुळे अस्तव्यस्त पडलेली माती तसेच खुदाई केलेले चर हे अपघातास निमंत्रण ठरत आहे. काही दिवसावर पावसाळा येऊन ठेपल्यामुळे अशा कासवाच्या गतीने हे काम झाले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतुकीला अडथळा ठरणार आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देऊन गटाराचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांसह वाहनचालकांमधून होत आहे.