
वेंगुर्ले : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन च्या डिस्ट्रिक्ट ग्रँट प्रोजेक्ट *Rotary open library* या तालुक्यातील एकूण ६ शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रोजेक्टचे अनावरण आज माजी प्रांतपाल रो नासिरभाई बोरसादवाला यांच्या शुभहस्ते शाळा वेंगुर्ला नं ४ मध्ये पार पडले,यावेळी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन चे अध्यक्ष रो योगेश नाईक,सेक्रेटरी रो एड प्रथमेश नाईक,माजी अध्यक्ष रो राजू वजराटकर,रो पंकज शिरसाट,रो डॉ वसंतराव पाटोळे,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम संध्या बेहेरे,ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष परब,पालक तसेच अन्य शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होत.
यावेळी बोलताना माजी प्रांतपाल रो नासिरभाई यांनी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला च्या कामाची प्रशंसा करत असेच समाजाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहित केले.तसेच शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य पुरविण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची डोळे व दंत चिकित्सा शिबिर आयोजित करुन त्यावर रोटरी मार्फत मोफत उपचार करण्याचे नियोजन केले.रोटरी क्लब वेंगुर्ला चे अध्यक्ष रो योगेश नाईक यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत या उपक्रमासारखेच शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम आपल्या क्लब मार्फत भविष्यात राबविले जातील असे आश्वासित केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष परब यांनी केले,प्रास्ताविक रोटे वेंगुर्ला चेगत वर्षीचे अध्यक्ष रो राजू वजराटकर यांनी केले तर आभार सेक्रेटरी रो प्रथमेश नाईक यांनी मानले.