
कणकवली : खारेपाटण ग्रामपंचायतीच्यावतीने खारेपाटण हायस्कूल येथील बालोद्यान गार्डन मध्ये ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोग निधीतून सुमारे १ लाख रुपये खर्च करून बनविण्यात आलेल्या "ओपन जिम" चा शुभारंभ आज सोमवार दि.१ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद चे माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र जठार यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या खारेपाटण गावच्या सरपंच सौ प्राची ईसवलकर यांच्या प्रमुख उपस्थित ह्या "ओपन जिम" चे जाहीर लोकार्पण करण्यात आले.प्रारंभी खारेपाटण गावचे उपसरपंच श्री महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून या "ओपन जिम शुभारंभ " कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला खारेपाटण माजी पं.स.सदस्य तृप्ती माळवदे, माजी सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, मनाली होणाळे, दक्षता सुतार,खारेपाटण पतसंस्थेचे संचालक संतोष पाटणकर, मनस्वी कोळसुलकर, राजेंद्र वरूणकर खारेपाटण सोसायटीचे संचालक विजय देसाई, इस्माईल मुकादम, मोहन पगारे,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेचे सचिव महेश कोळसुलकर, संस्थेचे संचालक व खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे,खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत, भाजप पक्षाचे कार्यकर्ते देवानंद ईसवलकर, शेखर शिंदे, प्रणय गुरसाळे, शेखर कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी उपस्थित मान्यवरांचे पुषगुच्छ देऊन स्वागत केले. ओपन जिम शाळेजवळ निर्माण केल्याबद्दल ग्रामस्थाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ होणार असल्याचे सांगितले. सर्वांचे आभार व्यक्त केले.










