
सिंधुदुर्गनगरी : ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेवर देवगड तालुक्यातून एक आणि कुडाळ तालुक्यातून एक अशा दोनच हरकती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत
जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समित्यांची प्रभाग रचना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी 14 जुलैला जाहीर करून 21 जुलै पर्यत प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविल्या होत्या त्याप्रमाणे दोनच हरकती प्राप्त झालेल्या आहेत
देवगड तालुक्यातून एक आणि कुडाळ तालुक्यातून एक अशा केवळ दोनच हरकती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत दोन्ही तक्रारी मध्ये प्रभागातील काही गाव बदला बाबत हरकती घेण्यात आल्या आहेत यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देणार आहेत