पेडणेकर ज्वेलर्सच्या दागिन्यांच दोडामार्गमध्ये प्रदर्शन

नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते झालं उद्घाटन
Edited by:
Published on: April 18, 2024 13:39 PM
views 89  views

दोडामार्ग : जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या विविधांगी दागिन्यांच्या गुरवारी पार पडलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन दोडामार्गचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी रंगनाथ गवस, प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर देसाई, केंद्रप्रमुख गुरुदास कुबल यांसह पेडणेकर ज्वेलर्सचे अजित खैरे आदी मान्यवर उपस्थित होते. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांशी विश्वासाच अतुट नातं निर्माण करणाऱ्या पेडणेकर ज्वेलर्स यांच्या दागिन्यांना ग्राहकांनी पसंदी द्यावी असं आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण व उपस्थित मान्यवरांनी केलं. बड्या शहरात असलेल्या हटके दागिन्यांच दालन या प्रदर्शन निमित्तानं दोडामार्ग मध्ये आल्याने ग्राहकांनी ही याला पसंदी देत प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या दागिन्यांची खरेदी केली. यावेळी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर आयोजित राजेशाही संग्रह 2024 चेही उपस्थित मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं.