कोकणच भलं नरेंद्र मोदी, नारायण राणेच करू शकतात

बाकीचे फक्त भाषण ठोकतात : दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2024 14:01 PM
views 81  views

सावंतवाडी : जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणि नारायण राणे नेहमीच एकत्र असतो‌. त्यामुळे राणे पुन्हा मंत्री झाले पाहिजेत याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल भलं नरेंद्र मोदी, नारायण राणेच करू शकतात. बाकीचे केवळ भाषणं ठोकू शकतात असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांना हाणला. सावंतवाडी येथील नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी सौ. निलम राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकी निमित्ताने या महिला मेळाव्याच आयोजन केलं आहे. महिला ही आदिशक्ती, आदिमाया आहे. या आदिशक्तीला मी नमन करतो. महिलांमधील आदिशक्ती जेव्हा जागी होईल तेव्हा कोकणात बदल होईल. वेगवेगळ्या योजना महिलांसाठी योजील्या आहेत. त्याची जनजागृती महिलांमध्ये झालेली आहे. येणाऱ्या काळात बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार महिलांना उपलब्ध होणार आहे. आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. एखाद्या शेफ पेक्षा चांगले जेवण महीला करतात. घरगुती जेवणासाठी अनेक पर्यटक इथे पर्यटना निमीत्त येतात. 'ब्रेड अॅण्ड ब्रेकफास्ट' योजनेच्या माध्यमातून महिलांना ही संधी मिळेल. महिलांच्या हाताला रोजगार मिळावा हा माझा उद्देश आहे. रत्नसिंधू योजनेतून कुक्कुटपालन, काथ्या उद्योग आदीं सारख्या योजना राबविण्यात आल्या. त्यातून महिला बचत गटाला उत्पन प्राप्त होत आहे. काजूचे बोडू, फणासाचे गरे यांच्या पासून उत्पादीत होणाऱ्या वस्तूला परदेशातही बाजारपेठ उपलब्ध आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याचं बजेट मोठ आहे. मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे उद्योग यातून उपलब्ध होणार आहेत. तुमच्या उद्योगाची जबाबदारी आमदार म्हणून मी घेतलेली आहे‌. त्यासाठी नारायण राणेंना मतदान करून पुन्हा एकदा केंद्रात पाठवण आवश्यक आहे‌. भारतातील नागरीक हे नरेंद्र मोदी यांचं कुटुंब आहे असं ते मानतात. देशाला आर्थिकदृष्ट्या जगात पुढे घेऊन जाण्याच काम त्यांनी केलं. कोकणी मनुष्य म्हणून मला अभिमान आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी मी आणि नारायण राणे नेहमीच एकत्र असतो‌. ते पुन्हा मंत्री झाले पाहिजेत याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल भल नरेंद्र मोदी, नारायण राणेच करू शकतात. बाकीचे केवळ भाषण ठोकू शकतात असा टोला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांना हाणला. 

तर शासनाच्या योजना तुमच्या घरापर्यंत पोहचत आहेत. गावोगावी जाऊन आमची बदनामी करणाऱ्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की कोकणी माणूस कधीही विकला जाऊ शकत नाही. विकासासाठी, विचारांसाठी आम्ही बंड केल. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात कोकणाला काहीही मिळाल नाही. त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे एक रूपया पर्यटनासाठी खर्च करू शकले नाहीत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी लोकांना स्वाभिमान शिकवला. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना बाळासाहेब हिंदू मानत नव्हते, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांना अभिमान होता. पण, उद्धव ठाकरेंनी कॉग्रेसच्या सोबत जाण पसंत केलं. बाळासाहेबांचे विचार सोडण पसंत केलं. आदित्य ठाकरेंनी सावरकरांवर बोलणाच्य राहूल गांधींना मिठी मारली अशी टीका दीपक केसरकर यांनी ठाकरेंवर केली. 

दरम्यान, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार विधायक कार्य करत आहे. यासह चांगलं जीवन आणि कोकणच्या भवितव्यासाठी सक्षम खासदार दिल्लीला पाठवल पाहिजे. त्यात एकच नाव समोर येत ते म्हणजे,केंद्रीय मंत्री नारायण राणे. त्यामुळे खासदार म्हणून त्यांना मोठ्या मताधिक्यान दिल्लीत पाठवा, महिलांच सर्वांना ऐकावं लागतं मला देखील पत्नीच ऐकावं लागत. त्यामुळे नारायण राणेंना विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं. याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सौ. निलम राणे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अँड. निता सावंत, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर,राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, अनारोजीन लोबो,  संध्या तेरसे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.