
सावंतवाडी : शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. लहान गटात जिल्हा परिषद शाळा कुडाळ पडतेवाडी तर मोठ्या गटात पाट हायस्कूल प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक जि.प.शाळा कुडाळ पडते वाडी, तालुका कुडाळ , द्वितीय क्रमांक -जि. प.शाळा सावंतवाडी नंबर ४, तालुका सावंतवाडी, तृतीय क्रमांक एस. एम. हायस्कूल कणकवली (प्राथमिक विभाग ) तालुका कणकवली, उत्तेजनार्थ १. -जि. प. शाळा बोडदे ,तालुका दोडामार्ग, उत्तेजनार्थ २. जि. प. शाळा सावंतवाडी नं.२ ता.सावंतवाडी. तर विशेष उल्लेखनीय जि.प.शाळा तिर्लोट मराठी ता.देवगड, जि.प.शाळा आडवली नं 1, ता.मालवण,जि. प. शाळा माजगाव नं.३ ता.सावंतवाडी, जि.प.शाळा तळेरे नं.१,ता.कणकवली, जि.प.शाळा वर्दे ,ता.कुडाळ यांनी प्राप्त केले
मोठ्या गटात प्रथम एस.एल.देसाई पाट हायस्कूल, तालुका कुडाळ, द्वितीय न्यू.इंग्लिश स्कूल कसाल , तालुका कुडाळ ,तृतीय - माध्यमिक विद्यालय नाटळ,तालुका कणकवली .
उत्तेजनार्थ १.जि.प. शाळा पेंढर्याची वाडी तालुका वेंगुर्ला, उत्तेजनार्थ २. गजानन विद्यालय पाट,तालुका कुडाळ यांनी तर विशेष उल्लेखनीय विद्याविहार इंग्लिश स्कूल आरोस, तालुका सावंतवाडी, जि. प. शाळा मालवण दांडी, ता.मालवण, कळसुली हायस्कूल, तालुका कणकवली, जि.प.केंद्रशाळा साळीस्ते १,ता.कणकवली,जि.प. विद्यामंदिर शिराळे, तालुकावैभववाडी यांनी प्राप्त केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनोज गवाणकर, श्रीमती वेदिका चव्हाण, श्रीमती ज्योत्स्ना गावडे, श्रीमती पल्लवी नाडकर्णी यांनी काम पाहिले. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांकडून उस्फुर्त प्रतिसाद लाभला. लहान गटातून 100 शाळांनी सहभाग घेतला तर मोठ्या गटातून 84 शाळांनी सहभाग घेतला. साने गुरुजी कथामालेची निर्मिती असलेल्या "चम चम चम पुनवेचा" या गाण्यावर ही स्पर्धा घेण्यात आली होती. गीत एक आणि नृत्याविष्कार अनेक याची प्रचिती या स्पर्धेमध्ये आली.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघानी या एकाच गीतावर वैविध्यपूर्ण नृत्याविष्कार करून या स्पर्धेला आणि या गीतालाही एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. अल्पावधीतच हे गीत विद्यार्थीप्रिय झाले. शासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण सप्ताहामध्येही या गाण्यावर अनेक शाळांमधील मुलं थिरकली.हे आनंद गीत अनेक शाळांमध्ये साभिनय म्हटले गेले.हे गीत विद्यार्थ्यांबरोबरच पालकांपर्यंतही पोहोचले. अनेक शाळातील शिक्षण सप्ताहाचा एक अविभाज्य घटक झाले. आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल दीपक भाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व शाळा,विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.या स्पर्धे साठी सहकार्य करणारे सर्वशाळा,संस्थाचालक,मुख्याध्यापक,विद्यार्थी,शिक्षक, पालक,ग्रामस्थ, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,शिक्षणाधिकारी व साने गुरुजी कथामालेचे सर्व सदस्य या सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत. उदंड प्रतिसाद दिल्यामुळेच ही ऑनलाईन स्पर्धा यशस्वी करू शकलो, असे या स्पर्धेचे आयोजक राजन पोकळे व सुरेश ठाकूर अध्यक्ष साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांनी सांगितले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शिक्षण मंत्री दीपक केसरकर व इतर मान्यवरांच्या हस्ते लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.
.