दोडामार्गमधील विकासकामांची उद्या मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजने

Edited by:
Published on: June 05, 2023 17:21 PM
views 160  views

दोडामार्ग : तालुक्यातील विविध विकासकामांची भूमिपूजने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी 6 जून रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दिली आहे. 

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले की, उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी तालुक्यातील दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय इमारत व साटेली - भेडशी येथील क्रीडासंकुलाचेही भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले. ह्या दोन्ही विकास कामांचे भूमीपूजन  सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 9.30 वाजता या दोन्ही विकासकामांच्या ठिकाणी पुरोहितांच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा होणार आहे. शिवसेना - भाजपा सरकारच्या माध्यमातून  तरी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व तमाम कार्यकर्त्यांनी विकासकामांच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख गणेशप्रसाद यांनी केले आहे.