
वैभववाडी : लोरे मांजलकरवाडी येथील चंद्रकांत शंकर डोंगरे (वय ४८) हे सोमवार (दि. ७ नोव्हेंबर)पासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचे वडील शकंर धोंडू डोंगरे यांनी पोलिसांत दिली आहे.
चंद्रकांत सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काहीही न सांगता निघून गेला आहे. कुठेतरी गेला असेल म्हणून घरातील लोकांनी त्याची दुपारपर्यत चौकशी केली नाही. परंतू दुपारनंतर त्याचा शोध घेण्यास सुरूवात झाली. तो आजूबाजूला कुठेच आढळून आला नाही. त्यामुळे नातेवाईकांकडे देखील चौकशी करण्यात आली. परंतू आढळून न आल्यामुळे वडील शंकर डोंगरे यांनी मंगळवारी ता. ८ वैभववाडी पोलिसांत बेपत्ताची फिर्याद दिली आहे. यासंदर्भातील अधिक तपास पोलीस हवालदार रमेश नारनवर हे करीत आहेत.