
देवगड : देवगड तारामुंबरी येथील खाडीत बुडून एक जण बेपत्ता झाल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी समोर आली असून बेपत्ता झालेल्या नागरिकाचे नाव अनिल गणपत मुणगेकर (रा. देवगड शहर) वय 55 आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार खाडीमध्ये पोहण्यासाठी गेला असता ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बुडत असल्याचे समजल्यावर येथील स्थानिक नागरिकांनी त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. हा मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून पोहण्यासाठी गेला असता फीट आल्याचे बोलले जात आहे.










