LIVE UPDATES

कोकणसाद IMPACT ; अखेर 'बांधकाम'ला जाग

वृत्ताची दखल घेत नगरसेवक देवा टेमकर यांचा पाठपुरावा
Edited by: विनायक गांवस
Published on: May 30, 2026 12:27 PM
views 42  views

कोलगावातील मातीचा ढिगारा उचलला 

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या सीमेवर कोलगाव येथे मातीचा ढिगारा असल्याने पाणी रस्त्यावर येत होते. यामुळे प्रवाशांचे अपघात होत होते. याबाबत कोकणसादने दिलेल्या बातमीनंतर अखेर बांधकाम विभागाला जाग आली आहे. या वृत्ताची दखल घेत नगरसेवक देवा टेमकर यांनी पाठपुरावा केला. यानंतर तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली आहे. 


या परिसरात गटार खोदाईचे काम अर्धवट स्थितीत असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या अपूर्ण कामामुळे परिसरात अपघातांचे सत्र सुरू होते‌. याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वृत्ताची दखल घेत नगरसेवक देवा टेमकर यांच्या मागणीनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत संबंधित परिसर स्वच्छ केला आहे. यामुळे होणारे अपघात टळले आहेत. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.