कणकवली कृष्णनगरी नजीक गाडी पलटी होऊन एक जण गंभीर

Edited by:
Published on: March 05, 2024 05:01 AM
views 1125  views

कणकवली : कणकवली जवळील महामार्गावर असणाऱ्या जाणवली कृष्णा नगरी नजीक बोलेरो गाडी पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये  चालक- अक्षय ज्ञानदेव केळकेंद्र वय - 28 वर्षे, रा. अहमदनगर हा गंभीर जखमी आहे. ती गाडी गोव्याच्या दिशेने जात होती.  सकाळी 5 च्या सुमारास हा अपघात झाला. नेमका अपघात कसा झाला हे माहित नसले तरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.