जाणवली येथे टेम्पोचा अपघात एक जण जखमी

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 17, 2023 08:07 AM
views 874  views

कणकवली :कणकवली नजीक असलेल्या जाणवली बौद्धवाडी जवळ कोंबडी वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला. हा अपघात सकाळी 6:30 च्या सुमारास झाला असून यामध्ये एक जण गंभीर जखमी आहे. हा टेम्पो कणकवलीच्या दिशेने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने  हा रस्त्याच्या असलेल्या कठड्या वर चढला यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून आत मध्ये असणाऱ्या कोंबड्या देखील काही मरण पावले आहेत.