एक दिवस छोट्यांच्या कार्यक्रमात लहान मुलांनी लुटला आनंद

नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन : बच्चे कंपनीने अनुभवली आनंदाची पर्वणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 22, 2022 18:32 PM
views 192  views

कणकवली : कणकवलीत समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने एक दिवस छोट्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये

ऑर्केस्टातील गाणी, सोबत विविध पदार्थांचा खमंग वास, झगमगीत विद्युत रोषणाई, सेल्फी पॉईंट, विविध प्रकारची पाळणी, बलून गेम्स आदी आल्हाददायी वातावरणामुळे कणकवलीतील खाऊगल्लीला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. बच्चे कंपनीसोबत पालकाच्या गर्दीने तर रस्ते ओसंडून वाहत होते. खाऊगल्लीच्या खजिन्याची पेटी उघडून आगळ्या पद्धतीने या खाऊगल्लीचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांनी केले. या पेटीतील चॉकलेटच्या लकी ड्रॉतील चौघा मुलांना चांदीच्या नाण्याची बक्षिसीही मिळाली. एकंदर खाऊगल्लीच्या 'इव्हेंट'ने कणकवलीत बच्चे कंपनीने आनंदाची पर्वणीच अनुभवली नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाने शहरातील गणपतीसाना येथे आयोजित केलेल्या 'खाऊगल्ली'मध्ये पिझ्झा, पाणीपुरी, भेळपुरी, चायनिज़, चिकन तंदूर, बिर्याणी, आईस्क्रीमसह अन्य पदार्थ्यांच्या स्टॉलमुळे बच्चे कंपनीची चंगळ झाली. याशिवाय मनोरंजनासाठी गेमिंग झोन ऑर्केस्टा बोलक्या बाहुल्या, जादू कार्टून्स व सेल्फी पॉईंटमुळे बच्चे कंपनीसह त्यांच्या पालकांना पर्वणी ठरली. मज्जा मस्ती आणि तुफान गर्दीमुले 'खाऊगल्ली'ला आगळेवेगळे स्वरूप प्राप्त झाले होते.

खाऊगल्लीच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, नगरसेवक रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, संजय कामतेकर,अभिजीत मुसळे, अॅड. विराज भोसले, राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबीद नाईक, शिशीर परुळेकर, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, ऊर्वी जाधव, कविता राणे, उद्योजक राजू गवाणकर, महेश सावंत, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, साक्षी वाळके, संजीवनी पवार, राजश्री धुमाळे, चारू साटम, अजय गांगण, सुशिल पारकर, संदीप मेत्री आदी उपस्थित होते.