शिकारीच्या साहित्यासह एकाला अटक

Edited by: दिपेश परब
Published on: August 16, 2023 15:07 PM
views 2591  views

कुडाळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कुडाळ कुपवडे येथे धाड टाकून एका शिका-याला अटक केली आहे. स्वप्नील परब या शिका-याने त्याच्या राहत्या घराच्या मागील बाजूच्या पडवीत दोन बंदूका व खवले मांजराची खवले लपवून ठेवलेली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला याची माहीती मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे.


आरोपी कडून मिळालेला मुद्देमाल

२५००० रुपये किमतीची सिंगल बॅरल काडतुसची बंदूक, १०,०००/- सिंगल बॅरल ठासणीची बंदूक, ६००/- ४ जिवंत काडतुसे,

१२ किलो ९३० ग्रॅम खवले मांजराची खवले इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.