
वैभववाडी : शहरातील शासकीय गोदामानजीक मटका जुगाराची रक्कम घेताना येथील रुपेश ऋषिकेश घाडीगांवकर (वय३७)याला पोलिसांनी आज (ता २५) ताब्यात घेतले.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग या पथकाने दुपारी ३.३० च्या दरम्यान ही कारवाई केली असून रोख रक्कम ३हजार ५० रुपये व जुगाराचे साहित्य संशयिताकडून जप्त केले आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला शहरातील शासकीय गोदामात नजीक मटका जुगार घेतला जातो अशी गुप्त माहिती मिळाली होती.त्यानुसार या पथकाने आज या भागात दुपारी सापळा लावला होता.यावेळी संशयित आरोपी श्री घाडीगांवकर हा मटका जुगाराचे रक्कम जमा करीत असताना रंगेहाथ सापडला.यावेळी त्याच्याकडे सापडलेल्या एका को-या कागदावर कल्याण असं लिहून त्याच्या पाठीमागे मटक्याची आकडेमोड केली होती.तसेच एक पेन व ३हजार ५० रुपये असा मुद्देमाल सापडला.पोलीसांनी पंचांच्या समक्ष हा मुद्देमाल हस्तगत केला आहे.ही कारवाईत पो.हे.श्री .खंडे, श्री डिसोझा, श्री गंगावणे,पो.काॅ.जयेश सरमळकर यांनी केली आहे.