
सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रशाळा उभादंडा नंबर १ या शाळेत सेवाभावीवृत्तीने हितेश धुरी व माजी विद्यार्थी यांच्यावतीने सर्व शालेय मुलांना दप्तर वाटप करण्यात आले. या शालेय उपक्रमाबरोबर गुरुपौर्णिमे निमित्त तेथील शिक्षकांचा व मार्गदर्शक यांचा सत्कार करण्यात आला. एकूणच राजन तेली यांचा वाढदिवस उभादांडा येथे शैक्षणिक उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात आला.
यावेळी निवृत्त शिक्षक किशोर नरसुले, सामाजिक कार्यकर्ते चिंतामणी धुरी, हितेश धुरी भूषण अंगचेकर, पत्रकार दाजी नाईक, ग्रामपंचायत सदस्य अस्मिता मेस्त्री, अंकिता केरकर, शुभांगी साळगावकर, आसोलीचे उपसरपंच संकेत धुरी, पोलीस पाटील नार्वेकर, मधुकर तिरोडकर, आशु फर्नांडिस, प्रशांत तिरोडकर, सुयश कांबळी, इंग्लिश स्पिकिंग कोर्स टीचर सुनील कांबळी, प्रणव धुरी, दीपेश केरकर, हेमंत धुरी, सुधीर डीचोलकर, देवेंद्र नाईक, श्रीकृष्ण मांजरेकर, प्रीतम केळुसकर, साळगावकर, अंकिता तिरोडकर, आनंद मेस्त्री, दत्ता भाईडकर, हरिश्चंद्र केळुसकर, अशोक भोजनाईक, जयेश राजाध्यक्ष यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी माजी विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करून त्यांना असेच कार्यक्रम करणाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेचे मुख्याध्यापक गणेश चव्हाण, शिक्षक अनिशा झोरे, सुहास रेडेकर, युनूस पठाण तसेच पोलीस पाटील नार्वेकर, पत्रकार दाजी नाईक, इंग्लिश स्पिकिंग कोर्स चे सर सुनील कांबळी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश धुरी यांनी तर आभार मुख्याध्यापक गणेश चव्हाण यांनी मानले.