मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन...!

Edited by: संदीप देसाई
Published on: July 17, 2023 21:48 PM
views 173  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका शिवसेनेच्यावतीनं शालेय शिक्षण मंत्री व आमदार दिपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने मंत्री केसरकर यांच्या वाढदीवसानिमित्त येत्या १८ ते २१ जुलै रोजी दोडामार्ग तालुक्यात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी माहिती दिली असून १८ जुलै ला सकाळी १० वा. दोडामार्ग शिवसेना कार्यालय येथे वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तर सकाळी ११ वा.करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कुल, साटेली भेडशी येथे विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम. सकाळी ११.३० वा. करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कुल, साटेली मेडशी येथे विद्यार्थांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.  १९ जुलैला सकाळी १० वा. शिवसेना कार्यालय दोडामार्ग येथे १० वी १२ वी विषेश प्राविण्य विद्यार्थांच्या गुणगौरव कार्यक्रम होणार आहे. तर  २० जुलैला  सकाळी १० वा. ग्रामिण रुग्णालय दोडामार्ग येथे मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प आयोजित करण्यात आला असून यात मोफत तपासणी शिबिर होणार आहे. 

२१ जुलैला सकाळी १० वा. प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे मेगा ऑर्थोपेडिक कॅम्प मोफत तपासणी शिबिर लोकमान्य हॉस्पीटल पुणे यांच्या सहकार्यान होणार आहे.  २३ जुलै ला सकाळी ०९ वा.वर्षा मॅराथॉन स्पर्धा (दोडामार्ग तालुका मर्यादित) होणार असून याचं उद्घाटन स्वतः मंत्री दिपक केसरकर उपस्थित राहून करणार आहेत. हा शुभारंभ  दोडामार्ग गाधी मिशन स्कुल (दोडामार्ग-आयी रोड) येथे होणार आहे.

तरी सर्व दोडामार्ग वासियांनी या कार्यक्रमांना व शिबिरास उपस्थित रहावे. असे आवाहन शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख श्री. गणेशप्रसाद गवस यांनी केले आहे.