१६ जानेवारीला स्व. गोविंदरावजी निकम जयंती महोत्सव - पुरस्कार वितरण सोहळा

जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व प्रसिद्ध उद्योजक मंदार भारदे यांची उपस्थिती
Edited by:
Published on: January 13, 2025 11:26 AM
views 155  views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक,माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त, दि. १६ व १७ जानेवारीला  सावर्डे येथील स्मृतिगंध या त्यांच्या स्मारक स्थळी जयंती महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. यानिमित्त 16 जानेवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता जयंती महोत्सव शुभारंभ प्रसंगी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे,  "मी कसा घडलो"  व  प्रसिद्ध उद्योजक मंदार भारदे यांचे,  "व्यवसाय पंथे चालावे" या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार शेखरजी निकम उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेच्यावतीने दिला जाणाऱ्या सन 2025 चा शिक्षणमहर्षी गोविंदराव निकम सह्याद्रि पुरस्काराने राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट चिपळूण यांना सन्मानित केले जाणार आहे.

पुरस्काराचे स्वरुप रु.25000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असून या पुरस्काराचे वितरण 16 जानेवारी रोजी सकाळी 10.30  वाजताच प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. 

सकाळी साडेआठ वाजता भक्ती संगम कार्यक्रम अश्विनी थिएटर्स,चिपळूण यांच्यावतीने सादर केला जाणार आहे. दुपारी तीन वाजता  स्व. गोविंदराव निकम गौरव गीत लोकार्पण व राधा गोविंद फाउंडेशन निर्मित शिक्षण महर्षी माजी खासदार गोविंदरावजी निकम यांच्या कर्तुत्ववान कारकिर्दीवर आधारित चित्रपट निर्मिती मुहूर्त केला जाणार आहे. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते शैलेश दातार व असित रेडीज यांची उपस्थिती लावणार आहे.दुपारी सव्वातीन वाजता व्यावसायिक महाविद्यालये सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे यांच्यावतीने सह्याद्री युवा कलाविष्कार  सादर केला जाणार आहे. सायंकाळी सात वाजता भजन संध्या हा कार्यक्रम सह्याद्री परिवार कर्मचारी वृंद यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला आहे.

17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता सह्याद्री कला मंच प्रस्तुत गीतांजली, 9.30 वाजता गोविंदरावजी निकम जिल्हास्तरीय वक्तृत्व,निबंध स्पर्धा  व सह्याद्री विज्ञान मंच आयोजित सह्याद्री प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला असून याप्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष, बाबासाहेब भुवड,सर्व विश्वस्त मंडळ व ए. जी. मर्चंड सर्व्हिसेस न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलियाचे सहसंचालक ऑलिव्हर मर्चंड यांची उपस्थिती लाभणार  आहे.  11 वाजता सह्याद्री बाल कलाविष्कार प्राथमिक विभाग सह्याद्री शिक्षण संस्था यांच्यावतीने तर दुपारी तीन वाजता सह्याद्री युवा कलाविष्कार व्यावसायिक महाविद्यालय विभाग, सह्याद्री शिक्षण संस्था यांच्या वतीने सादर केला जाणार आहे. रात्री आठ वाजता श्री वाघजाई देवी नमन नाट्य मंडळ ओझरे खुर्द गुरववाडी ता. संगमेश्वर यांचे नमन  कार्यक्रम आयोजित केला आहे.दोन दिवसाच्या या जयंती सोहळ्यानिमित्त युवकांना प्रेरणादायी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 24 जानेवारी 2025 रोजी स्व. गोविंदराव निकम स्मृतिदिन निमित्त सकाळी आठ वाजता स्मारक दर्शन व आदरांजली, दहा वाजता विठू माऊली भजन मंडळ अपशिंगे जि. सातारा यांचा भावांजली कार्यक्रम व बारा वाजता पसायदान आणि पुष्पांजली सोहळा आयोजित केला असून सायंकाळी सात वाजता ह.भ.प.श्री.मनोहर लक्ष्मण धांगडे शिरगांव धांगडेवाडी, चिपळूण यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित करण्यात आले आहे.तरी या सोहळ्यास आपण बहुसंख्येने उपस्थित रहावे असे  संस्थेचे सचिव महेशजी महाडिक व सोहळा समिती आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.