वेंगुर्ला शिवसेनेच्या वतीने श्रमजीवी महिला-पुरूष कामगारांचा सन्मान

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संकल्पनेतून १ मे रोजी कार्यक्रम संपन्न
Edited by: दिपेश परब
Published on: May 02, 2023 17:33 PM
views 123  views

वेंगुर्ला : 

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे सर्वसामान्य व्यक्तींचा, त्यांच्या कामांचा सन्मान करणारे आहेत. आपल्या भागात पर्यटनांतून रोजगार निर्माण व्हावा यासाठी त्यांनी विकासाचे केलेले व्हीजन हे महत्वाचे आहे. वेंगुर्ले तालुक्यातील ३० गावांत श्री. केसरकर यांच्याकडून प्रत्येकी कमीत कमी ४ ते ५ कोटी व जास्तीत जास्त २० ते २५ कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्द करून दिलेला आहे. भविष्यात नवाबाग येथील फिशरमन व्हीलेज प्रकल्पही पूर्णत्वास आल्यानंतर त्या भागातील नागरीकांना पर्यटनदृष्ट्या तो फायदेशीर ठरणारा असल्याचे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले. 

       राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ले भटवाडी येथील श्री सिध्दीविनायक मंगल कार्यालयात वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सुमारे ५०० श्रमजिवी महिला-पुरुष कामगारांचा भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. 

     यावेळी व्यासपिठावर तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, प्रवक्ते सुशील चमणकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, मच्छिमारसेल प्रमुख गणपत केळुसकर, उभादांडा शाखाप्रमुख प्रकाश मोटे, उपशाप्रमुख शिवाजी पडवळ, महिला शहरप्रमुख श्रद्धा बाविस्कर- परब,  युवासेनेचे संतोष परब, अल्पसंख्यांक शहर संघटिका शबाना शेख, प्रभाकर पडते, शाखाप्रमुख राजू परब उपशाखाप्रमुख मनाली परब, सॅमसन फर्नांडिस, श्यामसुंदर कोळमकर, शिवाजी पडवळ, रसिका राऊळ, दाभोली उपसरपंच फिनसुअनिता फर्नांडिस, रझालीन डीसोजा, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, माया राऊळ, अरुणा परब, समाधान बांदवळकर, एकनाथ राऊळ, नरेश बोवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

     यावेळी माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे यांनी, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी वेंगुर्ले शहरात पर्यटन दृष्ट्या साकारलेली झुलता पुल, लाईट हाऊकडे जाणारा बंदर येथील मार्ग व होत असलेली विकास कामे मानसीगार्डन ते वेंगुर्ले बंदर सायकलींग ट्रँक पहाता स्वच्छतेत, सौदर्यीकरणात राज्यात प्रथम क्रमाक आलेली नगरपरीषद हि महत्वपूर्ण पर्यटन स्थळांमुळे राज्यात व देशात नावलौकीक होईल, श्री. केसरकर करीत असलेल्या विकासास दुरदृष्टीचे व्हीजन असल्याचे सांगितले.


 शहरी व ग्रामीण भागात विकासकामे होत असताना ग्रासरुट लेव्हल च्या श्रमजीवी कामगारांचा सन्मान व्हावा अशी मंत्री दीपक केसरकर यांची संकल्पना होती. आपल्या भागातील अत्यावश्यक विकास कामांसाठी श्री. केसरकर साहेबांनी मोठ्या प्रमाणांत निधी उपलब्द करून दिलेला आहे. अन त्याची विकास कामेही होत आहेत. अजूनही कांही नागरीकांनी एकत्रित येऊन सुचविलेली कामे आम्ही दिपक केसरकर यांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेऊ असे प्रतिपादन शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी या कार्यक्रमांत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी तर सुत्रसंचालक व आभाराचे काम शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व पुरुष कामगार उपस्थित होते.