
मालवण : बावखोल आंबेरी ते धामापूर मार्गे एस. टी. वाहतूक करताना रस्त्यावरील खड्डे व आजूबाजूला वाढलेल्या झाडाझुडूपांमुळे एस. टी. वाहतुकीस अडथळा येत होता. सदर एस. टी वाहतूक सुरळीत होण्याकरिता आंबेरी वरचीवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र जमून श्रमदानातून सदर रस्त्यावरील खड्डे बुजवले व झाडे झुडुपे साफ करून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यात आला. श्रमदानातून हे काम करण्यात आले. यावेळी आंबेरी वरचीवाडी येथील राजेंद्र परब, निलेश तावडे, विश्राम राऊत, विजय तावडे, लक्ष्मन राऊत, अभिषेक कांबळी, तन्मय परब, शिवराम राऊत, नितेश राऊत, नितीन परब, पंकज राऊत, विजय मांजरेकर, दिलीप राऊत, सुशांत परब, भालचंद्र राऊत हे सर्व ग्रामस्थ होते.