
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील वांद्री जि.प. शाळेत विद्यार्थीनींसोबत घडलेल्या प्रकाराबाबत जिल्हा परिषद प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. आत्तापर्यंत 3 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधीत शिक्षकाला तसेच घडलेला प्रकार माहिती असूनसुद्धा लपवून ठेवल्याचा ठपका ठेवत मुख्याध्यापिकेवर सुद्धा निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर सहकारी शिक्षिकेला सुद्धा कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे करणार्या शिक्षकाला ग्रामस्थांनी पकडले होते. यानंतर हा वाद वाढल्याने अखेर पोलिस स्थानक गाठावे लागले होते. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षकावर कारवाई करून त्याला अटक केली आहे. सध्या या शिक्षकाची चौकशी सुरु आहे. सध्या या प्रकरणामुळे तालुक्यातील वातावरण तणावग्रस्त बनले आहे. संबंधित शिक्षक संजय मुळ्ये याच्यावर जि. प. ने लगेच कारवाई करत त्याचे निलंबन केले आहे. जि.प. प्रशासनाने शिक्षकाचे निलंबन करून, संबंधित शाळेच्या मुख्याधिपिकेला सुद्धा या गोष्टीला जबाबदार धरण्यात आले आहे. चौकशी अहवालात या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार माहिती असतानासुद्धा या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत, निलंबित केले आहे. त्याचबरोबर अजून एका सहकारीनशिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे,अशी माहिती शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी दिली आहे.