कणकवलीत २ डिसेंबरला एक दिवस छोट्यांचा

खाऊ गल्ली सह लहानग्यांसाठी अनेक मनोरंजनाचे उपक्रम समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन लकी ड्रॉ, खाद्यपदार्थांसह बरेच काही
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 24, 2023 14:22 PM
views 109  views

कणकवली : येत्या २ डिसेंबर रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे एक छोट्या मुलांसाठी एक दिवस छोट्यांसाठी, खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. 2 डिसेंबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी 5.30 वाजता या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ही माहिती दिली. 

यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजू गवाणकर आदि उपस्थित होते. श्री. नलावडे पुढे म्हणाले, गाण्याच्या मैफिलचा नजराणा पेश केला जाणार आहे . तसेच जादूगार चे जादूगार चे प्रयोग होणार आहेत.

लहान मुलांना आकर्षण असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून या ठिकाणी असणार आहेत. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी, थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना खाऊ साठी 50 रुपयांचे कुपन दिले जाणार आहे. स्टॉल साठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असणार आहे. तसेच या वेळी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मोफत लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

झोपाळे, पाळणी, अनेक खेळणी देखील या ठिकाणी असणार आहेत. स्थानिकांना, बचतगटाना स्टॉल साठी प्राधान्य देण्यात येणार देणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असणार आहे. या खाऊ गल्ली मध्ये पिझा, पाणीपुररी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, शोरमा, चायनीज, असे अनेक स्टॉल असणार आहेत.  या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नलावडे यांनी केले आहे.