
बांदा : दोडामार्ग तालुक्यात हैदोस घालणाऱ्या ओंकार हत्तीने आता बांदा पंचक्रोशीत धुमशान घातलंय. गुरुवारी पहाटे या ओंकारने घराच्या अंगणात उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर हल्ला चढवत मोठे नुकसान केले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावात ओंकार हत्तीने चारचाकी वाहनावर हल्ला केल्याची घटना ताजी असताना बांद्यात ओंकार हत्तीने गुरुवारी पहाटे गवळी टेम येथील रहिवासी कविटकर यांच्या अंगणात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर हल्ला करत तोडफोड केली. कविटकर यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.










