
देवगड : ओंकार रावजी खाजनवाडकर यांचं दिनांक 22 नोव्हेंबर 2025 अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. ते भारतीय जनता पार्टी देवगडचे किंजवडे जिल्हा परिषद गटप्रमुख होते.
लिंगडाळ गावातील हरहुन्नरी नेतृत्व तसेच मनमिळाऊ स्वभाव व हसतमुख व्यक्तिमत्व ओंकार खाजनवाडकर यांच्या रूपाने गावाला लाभले होते.ते अचानक हरपले त्यामुळे त्यांच्या या अश्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ओंकार हे भारतीय जनता पार्टीचे किंजवडे विभागीय अध्यक्ष तसेच कट्टर राणे समर्थक देखील होते.ते लहान थोर सर्वांचे लाडके होते.
कोरोनाच्या संकटात देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून देत अनेकांचे जीव त्यांनी वाचवले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अनेकांना खूप मदत केली. नेहमी प्रत्येकाच्या सुख दुखात सहभाग त्यांचा असायचा. तसेच निस्वार्थी व्यक्तीमत्व असलेले ओंकार संकटाच्या वेळी मित्रांना खूप सहकार्य करायचे त्यांच्या पश्चात आई ,वडील, दोन भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे.










