
सावंतवाडी : ओंकार हत्ती सावंतवाडी तालुक्यात स्थिरावला आहे. हत्तीला तात्पुरते 'वनतारा'ला पाठवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. मात्र, सद्यस्थितीत त्याच्या गरजा वाढत आहे. हे बघता ज्या भागात हत्तीचा वावर आहे तिथे गुरांना मोकळ्या जागेत दोरीन बांधून ठेऊ नये, असे आवाहन प्राणी अभ्यासकांनी केल आहे.

ओंकार हत्तीचा गेले काही दिवस बांदा, इन्सुली, वाफोली गावात वावर वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्या भितीनं फास लागून म्हैस गतप्राण झाली. तसेच एकीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वाफोली आईरवाडी येथील बागेत हा प्रकार घडला. यात साधारण ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे वनविभागाने म्हटलं आहे. दोरखंडाचा फास बसल्याने म्हैशीचा मृत्यू झाल्याचे काहींकडून म्हटले जात आहे. तर ओंकार हत्तीमुळेच एकीच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे व मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे. नुकसानीचा पंचनामा वनविभागान केला आहे. ओंकार हत्तीचा वावर या परिसरात वाढल्याने स्थानिक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्या भागात हत्तीचा वावर आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांना गाई, म्हशी गुरांना मोकळ्या जागेत दोरखंडान बांधून ठेऊ नये, असं आवाहन प्राणी अभ्यासकांनी केल आहे. तसेच ओंकार हत्तीच्या वाढत्या गरजा अन् जनता व त्याच्या सुरक्षिततेसाठी लवकरच वनतारा येथे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.










