सिंधुदुर्गात आढळलं ऑलिव्ह रिडलेचं हंगामातील पहिलं घरटं

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 07, 2023 12:28 PM
views 246  views

कुडाळ : सुखटनवाडी वेंगुर्ला समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले समुद्र कासव मादीने या हंगामातील पहिले घरटे दिसून आले आहे. सदर घरट्यात अंदाजे 115-120 अंडी असून बस्ताव बावतीस ब्रीटो, बीच व्यवस्थापक यांनी संरक्षित केलेले आहे अशी माहिती प्रसिध्दी पत्रकातुन कुडाळ वनविभागाचे वनक्षेत्रपाल संदिप कुंभार यांनी दिली.

     या अंड्याचा पंचनामा संदिप कुंभार ,वनक्षेत्रपाल कुडाळ(प्रा.) यांच्या उपस्थितीत सावळा कांबळे वनपाल मठ, सूर्यकांत सावंत वनरक्षक मठ यांनी केलेला असून कासव अंडी संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यक मार्गदर्शन स्थानिकांना करण्यात आलेले आहे.

 चालू हंगामात नवकिशोर रेड्डी ,उप वनसंरक्षक सावंतवाडी, व सुनिल लाड ,सहायक वन संरक्षक (खा.कू.तो व वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली  योग्य नियोजनातून आणि स्थानिक बीच व्यवस्थापक आणि वनकर्मचारी यांच्या मदतीने जास्तीत जास्त  समुद्री कासव अंडी संरक्षण व संवर्धन करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. तरी सर्व स्थानिक नागरिक यांना या समुद्री कासव संवर्धनात वन विभागास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.