दत्ताराम दुतोंडकर उबाठा सेनेचे अधिकृत सरपंच पदाचे उमेदवार : यशवंत परब

वायंगणी ग्रा.पं. निवडणुक
Edited by: दिपेश परब
Published on: October 26, 2023 12:30 PM
views 176  views

वेंगुर्ला : वायंगणी  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ मध्ये थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय पडते,  सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या  सूचनेनुसार सर्वानुमते सरपंच पदासाठी दत्ताराम उर्फ अवि अरुण दुतोंडकर यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी दिली आहे. 

त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी अवी दुतोंडकर यांच्या मागे संपूर्णपणे संघटनेची ताकद लावून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनही यशवंत परब यांनी केले आहे. यावेळी उपजिल्हाप्रमूख प्रकाश गडेकर उपस्थित होते.