रिक्षा स्टँड बाबतचा अधिकृत निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीत

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 07, 2023 19:47 PM
views 115  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील रिक्षा स्टँड बाबतचा अधिकृत निर्णय प्राधिकरणाच्या बैठकीत ठरवला जाईल अशी माहिती सहाय्यक उफप्रादेशिक अधिकारी नंदकीशोर काळे यांनी दीली.

जिल्हा परवाना रिक्षा जिल्ह्यात कुठेही लावता येतील या दै. कोकणसाद  ने दिलेल्या वृत्तावरून सोमवारी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावर काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की,सिंधुदुर्ग प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक दिनांक ३१.आँक्टो२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता  जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती तथापि सदरची बैठक पुढे ढकलून ती दिनांक २१नोव्हे २०२३ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे सदर बैठकीत जिल्ह्यात टेक्सीऑटोरिक्षा स्टॅण्डबाबत धोरणात्मक निर्णय घेणे हा विषय विचारार्थ व निर्णयार्थ ठेवण्यात आला आहे. याबाबत प्राधिकरणाचा जो निर्णय होईल तो वर्तमानपत्राव्दारे सर्व रिक्षा परवानाधारकांना कळविण्याची दक्षताघेण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅक्सी-ऑटोरिक्षा स्टॅण्डबाबतचा निर्णय घेण्याची प्रक्रिया कार्यवाहीखाली असल्याने सद्यस्थिती ज्या पध्दतीने रिक्षा व्यवसाय सुरु आहे त्यापध्दतीने तो करण्यात यावा असे त्यांनी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.