मंडणगडमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्यालय सुरू

Edited by:
Published on: December 20, 2024 18:03 PM
views 286  views

मंडणगड : मंडणगड शहरातील बाणकोट रोड येथे महाराष्ट्र शासनाच्या कामगार इतर कामगार कल्याण मंडळाचे कार्यालय नुकतेच सुरू झाले आहे.  ग्रामीण भागातील असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार बांधकाम कामगार, मजूर, रंगारी, प्लंबर, इलेक्ट्रिशन महिला व पुरुषांना या कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.

ग्रामीण भागात कुंभार काम, सुतारकाम, घरबांधणीचे काम करणारे अनेक महिला व पुरुष मजूर या योजनेमुळे लाभांवीत होणार आहेत. कार्यालयाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शासनाच्या विविध लाभांच्या योजनांचा लाभ मिळवण्याकरिता तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन नगरसेवक सुभाष सापटे व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तालुकावाशीयांना केले  आहे.