
दोडामार्ग : दहावी - बारावी मुलांना पुढील शिक्षणा साठी तहसील कार्यालयातून लागणारे दाखले त्यांना विलंब न करता प्राधान्याने देण्यात यावे अशी मागणी दोडामार्ग उबाठा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार पवार यांच्याकडे केली.
दहावी - बारावीचा विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागले असून त्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी आपल्या तहसील कार्यालयातून लागणारे दाखले किंवा कागदपत्र विलंब न करता देण्याची पूर्तता करावी किंवा गाव पातळीवर विभागानुसार कॅम्प लावावे जेणेकरून विद्यार्थी यांना सोयीस्कर होईल अशी मागणी युवा सेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख मदन राणे व पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी त्यांच्यासोबत सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, सिद्धेश कासार, संदेश गवस, समीर म्हावसकर उपस्थित होते. पुढील शैक्षणिक कामाकरिता दाखले घेण्यासाठी तर कोणाला अडीअडचणी येत असतील तर त्यांनी मदन राणे-9307823995
संदेश राणे - 8767582769
सिद्धेश कासार - 9022576119 संदेश गवस - 8275328463
समीर म्हावसकर - 9021152362 प्रदीप सावंत - 8180008775
यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.