पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी शासकीय भूखंडाची

Edited by: विनायक गांवस
Published on: May 17, 2024 14:18 PM
views 236  views

सावंतवाडी : नियोजित वैनतेय सहकारी गृहनिर्माण संस्था सावंतवाडी संस्था सावंतवाडी शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी कार्यरत करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरात शासकीय भूखंड ची मागणी  प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भातले निवेदन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना देण्यात आले. या संस्थेचे जेष्ठ सदस्य गजानन नाईक व मुख्य प्रवर्तक अँड संतोष सावंत,अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी श्री.साळुंखे यांनी सावंतवाडी शहरात पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी शासकीय भूखंड देण्यासंदर्भात यापूर्वीच नाहरकत ठराव नगरपरिषदेने घेतला आहे. त्या ठरावानुसार निश्चितच सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी संस्थेचे सदस्य राजेश मोडकर, हरिश्चंद्र पवार ,अमोल टेंबकर, राजेश नाईक, विजय देसाई ,प्रवीण मांजरेकर, रामचंद्र कुडाळकर, उमेश सावंत, दीपक गावकर आदींच्या सहींचे निवेदन देण्यात आले 

या निवेदनात म्हटले आहे की,सावंतवाडी शहरातील शासकीय भूखंड ची मागणी गेल्या पंधरा वर्षापासून संस्थेने केली आहे. सदरचा शासकीय भूखंडा संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही व्हावी आणि तो संस्थेच्या ताब्यात मिळावा. सदरच्या भूखंडाबाबत अन्य कुणी संस्थेने मागणी केली असेल तर आम्ही मागणी प्रथम केली आहे त्याचा प्राधान्याने विचार करावा अन्य कुठल्याही संस्थेला अथवा अन्य कुणालाही त्या भूखंडासंदर्भात कोणतीही कार्यवाही करू नये. हा भूखंड पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी मंजूर व्हावा म्हणून त्या संदर्भात चा ठरावही संमत करण्यात आला आहे.

सावंतवाडी मधील पत्रकारांनी एकत्रित येऊन वैनतेय सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण करून शासकीय भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या गृहनिर्माण संकुलाचा आराखडा शासकीय पातळीवर मंजुरीसाठी पाठविला आहे. तो मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा आहे असे या निवेदनात म्हटले आहे.