ODF प्लस मानांकन प्राप्त वाघिवरे गावाचा सन्मान !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 18, 2024 09:31 AM
views 371  views

देवगड : देवगड येथील वाघिवरे - वेळगिवे येथे ‘विकसित भारत संकल्प  यात्रेप्रसंगी वाघिवरे गांव OdF+ मॉडेल झाल्याबद्दल पाणी व स्वच्छता समुह समन्वयक विनायक धुरी यांच्या हस्ते वाघिवरे सरपंच राजन लाड यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. वाघिवरे येथील या संकल्प यात्रेचे उद्घाटन सरपंच राजन लाड यांनी केले.

यावेळी उपसरपंच सहदेव लाड,  ग्रामसेवक उमर मुल्लानी, आरोग्य विस्तार अधिकारी अडूळकर मॅडम , पर्यवेक्षिका पुजा सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया मांजरेकर , मानशी ठाकुरदेसाई, रूपेश मांजरेकर, राजश्री चव्हाण, निलेश नार्वेकर, मयुरी सावंत, पोलीस पाटील महेश लाड, तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान लाड, सीआरपी मेघाली लाड, संजना लाड, आरोग्य सेवक डी.बी. कांबळे, तलाठी रमाकांत डगरे, अनुप तेली, ग्रामपंचायत कर्मचारी निलेश लाड, संदेश लाड, डाटा ऑपरेटर शमिका कदम, लाभार्थी, ग्रामस्थ  व विदयार्थी, पोलीस अधिकारी  उपस्थित होते .

        यावेळी केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम मुद्रा लोन्स, स्टार्टअप इंडिया, पीएम आवास योजना, पीएम भारतीय जन औषधी योजना, उज्वला योजना, आयुष्यमान भारत, स्वच्छ भारत मिशन, जल जिवन मिशन , मनरेगा ,आदी विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली . तसेच शासनाकडील डिजिटल स्क्रीन असलेली सुसज्ज व्हॅन द्वारे केंद्र व राज्य शासनांचे योजना दाखवण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामसेवक उमर मुल्लाणी यांनी तर आभार सरपंच राजन लाड यांनी मानले .