जानकीबाईसाहेब आयुर्वेद कॉलेजमध्ये नर्सिंग असिस्टंट कोर्स सुरु

Edited by:
Published on: December 15, 2023 14:06 PM
views 87  views

सावंतवाडी : राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय सावंतवाडी येथे नर्सिंग असिस्टंट कोर्स सुरु करण्यात आला आहे. १८ ते ४५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी ९ महीने कालावधीसाठी हा कोर्स असणार आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये १०० टक्के शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट मिळणार आहे. याचा लाभ घेण्याच आवाहन जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेकडून करण्यात आलं आहे.

नर्सिंग असिस्टंट कोर्स व्यवस्थितरित्या पूर्ण केल्यास  प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, सामाजिक संस्था याठिकाणी नोकरीची संधी तसेच स्वतःचा होम बेस केअर टेकर व्यवसाय सुरु करता येऊ शकतो. शासनमान्य सर्टिफिकेट, सोयीस्कर ट्रेनिंग शेड्यूल, अनुभवी तज्ञ चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात हॉस्पिटल प्रॅक्टिकल ही या कोर्सची खास वैशिष्ट्य आहेत.

प्रवेश प्रक्रिया सुरु असून जागा मर्यादित आहेत. प्रवेशासाठी राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा, सुतिकागृह येथे भेट देण्याच आवाहन करण्यात आल आहे. अधिक माहितीसाठी ०२३६३-२७२३५९, रुग्णालय २७२०३७, २७२०८५ ,९४२११४६७९७,९४०४७४०६०६ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलं आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, सचिव गणेश बोर्डेकर, संचालक उमाकांत वारंग, प्राचार्य डॉ. विकास कठाणे, उपप्राचार्य डॉ. संजय दळवी, स्नेहलता मुननकर, राजू सावंत, जयंत बेळनाळकर, भार्गवराम शिरोडकर आदी उपस्थित होते.