उबाठातील अल्पसंख्याक सेलचे असंख्य कार्यकर्ते भाजपात

Edited by:
Published on: February 28, 2025 13:14 PM
views 480  views

मुंबई : बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उबाठाच्या छातीत धडकी भरवली असून सिंधुदुर्गातील उबाठाची बहुतांशी मुस्लिम अल्पसंख्यांक सेल ना. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये सामील झाली आहे. यामध्ये देवगड, कणकवली या तालुक्याच्या अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्षही आहेत.

सिंधुदुर्गातील उबाठा येथील अल्पसंख्याक सेलच्या बहुतांश कार्यकर्त्यांनी नामदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आज नामदार नितेश राणे यांच्या अधीश बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडला.

या वेळी देवगड आणि कणकवली तालुक्याच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्षही भाजपमध्ये सामील झाले. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये निसार शेख (जिल्हा सरचिटणीस, अल्पसंख्याक उबाठा), यासीन खान (जिल्हासदस्य, अल्पसंख्याक उबाठा), कादर खान (तालुका प्रमुख, अल्पसंख्याक उबाठा, कणकवली), कलाम खान (बूथ अध्यक्ष), कासम शेख (माजी पोलिस पाटील), अनवर शेख (उपतालुका प्रमुख, अल्पसंख्याक उबाठा, कणकवली), नासिर रमदुम (वैभववाडी उपजिल्हा प्रमुख, राष्ट्रवादी), कयुम होलेकर (तालुका प्रमुख, देवगड अल्पसंख्याक), सुनील कांबळी (कोळपे सरपंच), तोसीफ शेख (बूथ अध्यक्ष), पाटणकर (युवासेना, वैभववाडी) आणि अख्तर शेख यांचा समावेश आहे. यावेळी शाहू शहा आणि सलमान शेख देखील उपस्थित होते.

नामदार नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यापासून जिल्ह्याच्या विकासाला वेग आला आहे. सर्व समाजघटक आणि सिंधुदुर्गातील जनता त्यांच्या कार्यावर समाधान व्यक्त करत आहे. आमच्या भागाचा विकास नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो, असा विश्वास पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.