आता महाविकास आघाडीची लाट येणार : शेखर माने

Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 12:09 PM
views 57  views

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात पार पडत आहे. याप्रसंगी निरीक्षक शेखर माने यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देत पक्षाला नंबर एकला आणण्याचा प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ते कोकणात येऊन पहावं. तीन पक्षाची टोळी राज्यात काम करत आहे. भाजपला लोकांनी ओळखल आहे‌‌. त्यांना सत्तेपासून लांभ ठेवतील. सर्वेचा रिपोर्ट चांगला आहे. आता महाविकास आघाडीची लाट येणार आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास कोकण पक्षनिरीक्षक शेखर माने यांनी व्यक्त केला.


याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डॉंन्टस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, नम्रता कुबल, रेवती राणे, प्रसाद रेगे, संदीप गवस, सावली पाटकर,प्रदीप चांदेलकर, महादेव देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद महाले, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, गौतम महाले, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, सागर नाईक, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते