सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता हेलिपॅड वर त्यांचे स्वागत केलेल्या वैभववाडी तहसीलदार कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी एस पी हांगे आणि मालवण तहसीलदार कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी व्ही व्ही कंटाळे यांना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी निलंबित केले आहे तर, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांना खुलासा करण्याच्या नोटिसा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी बजावले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन व पूजन करण्यासाठी आले असता आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा असतानाही एस पी हांगे आणि व्ही व्ही कंटाळे हे दोघेजण घुसून या दोघांनीही मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला होता. हा विषय माजी आमदार वैभव नाईक यांनी लावून धरला होता याबाबत आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी गंभीर देखील या दोघांनाही निलंबित केले आहे तर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षित हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील आणि उपविभागीय अधिकारी कणकवली जगदीश कातकर यांना खुलासा करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षित झालेले ही हलगर्जीपणा आणि त्यामुळे झालेले निलंबन यामुळे महसूल विभाग आणि पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.