मंडणगड : विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, आंबडवे, ता. मंडणगड या महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी, सेवेत कायम करण्याच्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेल्या मागणीकरिता प्रजासत्ताक दिनी, आंबडवे येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
या विषयासंदर्भात शिक्षेकत्तर कर्मचारी देणगीदार जमीन मालक ग्रासम्थ सुदर्शन सकपाळ, सुशांत सकपाळ, अमोल सकपाळ, निलेश सकपाळ, निलेश जाखल, सुजाता सकपाळ, विनीता सकपाळ, प्रिती तांबे, प्रफ्फुल तांबे, राजेंद्र राऊत यांनी भिंगळोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहीतीनुसार आंबडवे येथे झालेल्या महाविद्यालयास गावातील ग्रामस्थांनी देणगीरुपाने मोफत जागा उपलब्ध करुन दिली. असे असताना मुंबई विद्यापिठाने ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केलेली नाही. विद्यापिठाचे अधिकाऱ्यांनी आम्हांला दिलेला शब्द वेळेवेळी फिरवीला आहे. देणगीदारांपैकी सात कुंटबातील व्यक्तींना कामावर घेण्यात आले. अद्याप सहा कुटुंबातील व्यक्तींना रोजगार देण्यात आलेला नाही. कामावर घेतलेल्या सात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना केंद्र व राज्यशासनाच्या कर्मचारी भरतीच्या अटी व शर्थीचे नियमांचे अधीन राहून भरती कऱण्यात आलेली नाही. सर्व कर्मचाऱ्यांना कॉनट्र्क्ट पध्दतीने कामावर घेण्यात आलेले आहे व दरवर्षी त्यांची मान्यता घेतली जाते. त्यांना कामावर कायम करण्यात आलेले नाही. विद्यापीठाच्या सेवेत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जात नाही. तर ठोक पध्दतीने वेतन दिले जाते. विद्यापीठाने दिलेल्या या वागणूकीचे विरोधात वेळोवेळी आवाज उठवूनही सेवेत कायम करणे, नियामाप्रमाणे वेतन देणे, व मागील फरकाची रक्कम देणे या तीन मागण्यासाठी विद्यापिठाचे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी गतवर्षीच्या जानेवारी महिन्यापासून चर्चा सुरु आहे. या संदर्भात सर्वांनी दिलेल्या आश्वासनांच्या पुर्तता न झाल्याने सर्व कर्मचारी प्रजासत्ताक दिनी उपोषण करणार आहेत. लिखीत आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार आहे.
आंदोलनांच्या पुढील टप्यात मुंबई विद्यापीठाचे बाहेर घंटानाद आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगीतले. फुले शाहू आंबेडकर या विचारांना मानणाऱ्या शंभरहून अधिक संघटनांनी या आंदोलनास पांठीबा दिलेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. या विषया संदर्भात तहसिलदार मंडणगड यांच्या कार्यालयात सकारात्मक चर्चा झालेली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.