कुडाळ आगारात नॉन एसी स्लीपर कोच बस प्रशिक्षणासाठी दाखल..!

Edited by:
Published on: August 29, 2023 20:17 PM
views 9440  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने दाखल झालेल्या स्लीपरकोच बस आज कुडाळ बस आगारात दाखल झाली ही बस पाहण्यासाठी प्रवाशांसह नागरिकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या सिंधुदुर्ग विभागाला दहा स्लीपर कोच नॉन एसी गाड्या उपलब्ध होणार आहेत. यापैकी एक गाडी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या सिंधुदुर्ग विभागाला प्राप्त झाल्यानंतर आज ही गाडी कुडाळ आगारात दाखल झाली.

सिंधुदुर्गातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या आगारातील 12 चालकांना नॉन एसी स्लीपर कोचचे प्रशिक्षण प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी कुडाळ आगारात ही स्लीपर कोच दाखल झाल्यावर नागरिकांनी ही गाडी मोठ्या संख्येने पाहण्यासाठी गर्दी केली.

रा. प. महामंडळाकडून पहिल्यांदाच या नियमित वाहतुकीसाठी स्लीपर कोच नॉन एसी गाड्या उपलब्ध करण्यात आले आहेत यापैकी पहिल्या टप्प्यातच सिंधुदुर्ग परिवहन विभागाला नवीन लालपरी गाड्या उपलब्ध झाल्या होत्या. आता नव्याने सिंधुदुर्ग परिवहन विभागाला दहा स्लीपर कोच नॉन एसी गाड्या उपलब्ध होणार आहेत. नवीन नॉन एसी स्लीपर कोच बस दाखल झाल्याने लांब पल्याला जाणाऱ्या प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.