
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्याचा पगार झाला नसल्यानं आज काम बंद आंदोलन पुकारले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून आपण तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच या आंदोलनाला ठाकरे शिवसेनेचा देखील पूर्ण पाठिंबा असल्याचे ठाकरे शिवसेना पदाधिकारी शब्बीर मणियार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी गेले दोन महिने आम्हाला पगार नसल्याने आम्ही कुटुंब चालवायचा कसं ? असा सवाल केला आहे. तसेच साडेतीन वर्षाचा पीएफ देखील अदा केला गेला नाही. दरम्यान, कॉन्ट्रॅक्टराने नगरपालिकेला बिल सादर केलं नसल्याने कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित राहावे लागल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला नोटीस बजावून देखील त्यांनी नगरपालिकेला सहकार्य केले नसल्याचे देखील प्रशासनानं सांगितले.
यावेळी हिदायतुल्ला खान, काशिनाथ दुभाषी, इफ्तेकार राजगुरु,राकेश नेवगी आदी उपस्थित होते.