
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयामध्ये चार तास लाईट नसल्यामुळे व जनरेटर बंद असल्याने रूग्णांचे हाल झाले होते. सामाजिक बांधिलकी व उदयनराजे भोसले प्रतिष्ठानचे संतोष तळवणेकर यांच्याकडून जनरेटरची दुरुस्ती करण्यात आली त्यामुळे रूग्णांना दिलासा मिळाला .
आठ दिवसात शासनाकडून इन्व्हर्टरची व्यवस्था न झाल्यास सामाजिक बांधिलकी व उदयन राजे भोसले प्रतिष्ठानकडून नवीन 2 इन्व्हर्टर बसवणार असल्याचे रवी जाधव यांनी सांगितले. आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये तब्बल चार तास लाईट नव्हती. गेल्या वर्षापासून इन्व्हर्टर ना दुरुस्ती आहे. त्यात जनरेटर मध्ये बिघाड असून याचा परिणाम रूग्ण तपासणीवर होतो. त्याच प्रमाणे रक्तपेढी, एक्स-रे, इसीजी मशीन, सिटीस्कॅन मशीन यंत्रणेत तब्बल चार तास बंद पडल्याने गावागावा वरून आलेल्या पेशंटचे हाल झाले. आज जवळपास 50% पेशंट परतून गेले. याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला मिळाली असता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली व पेशंटचे होणारे हाल पाहताच त्यांनी तत्काळ उदयनराजे भोसले प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष तळवणेकर यांच्याशी तात्काळ संपर्क साधून जनरेटर ची त्वरित दुरुस्ती करून घेतली व लाईट सेवा सुरळीत केली.
त्यावेळी उपचार घेत असलेले पेशंट त्याचप्रमाणे सिस्टर व डॉक्टर स्टाफ यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, संतोष तळवणेकर, शिवा गावडे यांचे आभार मानले.