माड्याची वाडी विद्यालयाची स्नेहल जाधवला NMMS शिष्यवृत्ती

Edited by: ब्युरो
Published on: April 23, 2024 15:10 PM
views 123  views

कुडाळ : एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय माड्याचीवाडी ची विद्यार्थिनी कुमारी स्नेहल सुनील जाधव हिला एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती मिळाली तसेच माड्याची वाडी विद्यालयातून सहा विद्यार्थी एन.एम.एम.एस. परीक्षा उतीर्ण झाले त्यापैकी कुमारी.नमिता गावडे,कुमारी वेदिका परब ,व दुर्वेश गावडे हे सारथी शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले.    

सर्व विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ,पाट सचिव श्री सुधीर ठाकूर, चेअरमनव श्री समाधान परब व  सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रावण बी एस. यांनी सर्वांचे अबिनंदन केले