नितीन गडकरी, कोकणी माणसाला बदनाम करु नका : परशुराम उपरकर

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 09, 2023 17:42 PM
views 139  views

कणकवली : मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. त्याबाबत ना.गडकरी यांनी या रखडलेल्या कामासाठी कोकणी माणूस जबाबदार आहेत असे म्हटले आहे, हे चुकीचे आहे.कोकणी माणसाला बदनाम करु नका. पहिल्यांदा या रस्त्यावरुन गाडीने फिरावे, मग समजेल.गडकरी साहेब. कोकणातील रस्ता कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडला असल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडलेले याला ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार आहेत.केंद्रीय मंत्री गडकरी हे चांगले काम करतात.त्याबद्दल कौतुक आहे.कोकणी माणसाला दोष देऊ नये.कोकण रेल्वे मार्गावर विना आंदोलन जनतेने जागा दिली.फक्त हायवे भूसंपादन करताना त्रास का झाला तर त्याला प्रशासन जबाबदार आहे.ना.गडकरी यांनी एकदा बांधलेल्या रस्त्यावर गाडीने फिरावे.त्यांना नक्कीच समजेल.पुणे बंगलोर रस्त्याने गाडीने फिरावे,कोणताही त्रास होत नाही,असे ही श्री.उपरकर यांनी म्हटले आहे.


कोकणातील रस्त्यावर कणकवलीत ब्रिजवर धबधबे आणि खड्डे दिसतील.त्यामूळे ना.गडकरी यांनी कोकणी माणसाला बोलू नये.समृध्दी महामार्ग ज्या गतीने केला, त्या धर्तीवर हा रस्ता केला पाहिजे.त्यांनी एकदा गाडीने येवून रस्त्याची पाहणी करावी,अशी मागणीही परशुराम उपरकर यांनी केली आहे.