नितेश राणेंची रत्नागिरी मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी घेतली भेट

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 19, 2022 16:16 PM
views 183  views

कणकवली : भाजपा आमदार नितेश राणे यांची रत्नागिरी मत्स्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी कणकवली ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील विजयदुर्ग परिसरात गिर्ये येथे शासकिय मत्स्य महाविद्यालय मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी प्राध्यापक डॉ. अभय सावंत, डॉ. सुरेश नाईक, डॉ. जयाप्पा कोळी, डॉ. मनोज घुघुसकर, श्री. कल्पेश शिंदे आदी उपस्थित होते.